ताजी बातमी

मुंबईतील दादर येथील चैत्यभूमी परिसरात दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर लाखो अनुयायी समता, बंधुता व मानवतेचा संदेश घेऊन अभिवादनासाठी येत असतात. या गर्दीच्या नियोजनासाठी शासकीय कर्मचारी, समता सैनिक दल, मुंबई महानगरपालिका कर्मचारी तसेच पोलीस बांधव हे अहोरात्र, न थकता आपली ड्युटी प्रामाणिकपणे बजावत असतात.

या सर्व सेवाव्रती कर्मचाऱ्यांच्या कार्याला मानाचा मुजरा करत बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 539, आदर्श महिला मंडळ, प्रशिक मित्र मंडळ आणि पर्णकुटी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने चहा व नाश्त्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली. या उपक्रमामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा वास्तविक बळ मिळाले.

या सामाजिक उपक्रमाचे नेतृत्व

कार्याध्यक्ष अनंत जाधव,

अध्यक्ष संदीप जाधव,

उपाध्यक्ष रमेश कांबळे,

सेक्रेटरी सुशील तांबे,

विकास मोहिते, जितेंद्र पवार, मंगेश जाधव,किशन शर्मा, राजेंद्र मांजळकर

यांच्यासह आदर्श महिला मंडळाच्या माधुरी जाधव, मनस्वी पवार, तृप्ती तांबे, छाया जाधव, समीक्षा पवार यांनी सक्रिय सहभाग घेतला.

महापरिनिर्वाण दिनासारख्या संवेदनशील व ऐतिहासिक दिवशी लाखो अनुयायांच्या सेवेसाठी रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाबद्दल मनापासून आभार व्यक्त केले. “अशा प्रकारचा सन्मान फार उर्जा देणारा असून समाजाशी आपली नाळ अधिक घट्ट करणारा आहे,” अशी भावना अनेक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

हा उपक्रम केवळ चहा-नाश्त्यापुरता मर्यादित न राहता सेवाभाव, कृतज्ञता, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा जिवंत संदेश देणारा आदर्श उपक्रम ठरला आहे. समाजानेही अशा विधायक कार्याला भरभरून प्रतिसाद देत अशाच उपक्रमांना पुढे नेण्याची गरज असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात