मराठी भाषा गौरव दिनानिमित्त SRA कार्यालयात कुसुमाग्रजांना अभिवादन
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राधिकरणाच्या कार्यालयात उत्साहात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त थोर कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अधिकारी व कर्मचारीवर्गाने त्यांच्या कवितांचे भावपूर्ण वाचन करून अभिवादन केले.
यावेळी झालेल्या मराठी पुस्तक वाचन सत्रात सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेत मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीबद्दलचा अभिमान व्यक्त केला. कार्यालयीन वातावरणात साहित्यिक ऊर्जेची प्रचिती देणारा हा उपक्रम मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला.