स्थानिक विकासाला नवे पंख: कांबळे दाम्पत्यांच्या प्रयत्नांना मिळाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शिवसेना मा. नगरसेवक रामदास कांबळे व सौ. पूजा रामदास कांबळे यांच्या पुढाकाराने सायन कोळीवाडा विधानसभा मधील वॉर्ड क्रमांक १७३ येथील पंचशील नगरातील महत्त्वाच्या विकासकामांना आज शुभारंभ झाला. पंचशील नगर क्र. ३ येथील रस्त्याचे काँक्रीटीकरण तसेच पंचशील नगर क्र. २ मधील गळ्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले.
या कामांमुळे नागरिकांना दररोजचा त्रास कमी होऊन सुरक्षित, स्वच्छ आणि टिकाऊ पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. परिसराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ही कामे लोकपयोगी आणि अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत.
स्थानिक नागरिकांच्या दीर्घकाळाच्या मागण्या पूर्ण करत लोकहिताला प्राधान्य देणारी प्रेरणादायी भूमिका नगरसेवक रामदास कांबळे आणि सौ. पूजा कांबळे यांनी बजावली आहे. सततच्या पाठपुराव्यामुळे प्रत्यक्ष विकासकामे सुरू होणे हा परिसराच्या प्रगतीचा नवा टप्पा मानला जात आहे.
नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत स्थानिक नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पंचशील नगराचा चेहरा बदलण्यासाठी सुरू झालेली ही कामे लवकरात लवकर पूर्ण होऊन जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.