ताजी बातमी

मुंबई: प्रभाग क्र. १७३, पंचशील नगर १ येथे संत सेवालाल बंजारा समाजातील बंधू-भगिनींसमवेत होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी होलिका मातेचे विधिवत पूजन करून “असत्य जळो, सत्य फुलो” असा सकारात्मक संदेश देण्यात आला.होळी सणाच्या निमित्ताने  राहुल लक्ष्मण जाधव स्वीय सहाय्यक  आमदार  प्रसाद लाड मीडिया जिल्हाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा, दक्षिण मध्य मुंबई यांनी 

परिसरातील महिला भगिनींना मिठाई वाटप करण्यात आले तसेच उपस्थित नागरिकांशी संवाद साधत सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. या उपक्रमामुळे परिसरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

संत सेवालाल बंजारा समाजातील बंधू-भगिनींनी एकत्र येत सण साजरा करत सामाजिक एकोपा आणि परंपरेचे जतन करण्याचा सुंदर संदेश दिला. नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात