ताजी बातमी

मुंबई : सायन-कोळीवाडा परिसरातील नागरिकांच्या आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलत रिपब्लिकन पक्ष (खोरीपा) दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष राजेंद्र काशीराम मांजळकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या निवेदनानंतर अखेर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने तात्काळ कारवाई करत परिसरातील साचलेला कचरा हटवण्याची मोहीम हाती घेतली.

मुकुंदराव आंबेडकर रोड, सनातन शाळेसमोर सायन कोळीवाडा येथे मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने परिसर अस्वच्छ होत होता. या ठिकाणी शाळकरी मुले व स्थानिक नागरिकांची ये-जा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर राजेंद्र मांजळकर यांनी संबंधित विभागाला लेखी निवेदन देत त्वरित कचरा उचलण्याची मागणी केली होती.

निवेदनाची दखल घेत महानगरपालिकेने जेसीबी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने साचलेला कचरा हटवून परिसर स्वच्छ केला. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून स्थानिकांनी प्रशासन आणि राजेंद्र मांजळकर यांचे आभार मानले आहेत.

सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेसाठी अशा प्रकारे सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचे नागरिकांनी कौतुक केले आहे. “स्वच्छ परिसर, निरोगी समाज” या संकल्पनेला बळ देणारी ही कारवाई लोकहितासाठी प्रेरणादायी ठरत आहे

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात