मसूूम तर्फे मेगा करिअर फेअर 2025 भव्यदिव्य सोहळ्यात यशस्वी संपन्न
प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती, 1,200+ सहभागी, 27 संस्थांचा सहभाग — मसूूमचा उपक्रम ठरला ऐतिहासिक
मसूूम संस्थेच्या संस्थापिका सौ. निकिता केतकर मॅडम आणि करिअर सेलचे डायरेक्टर श्री. युवराज बोराडे सर यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली आयोजित मेगा करिअर फेअर 2025 हा अभूतपूर्व प्रतिसादासह अतिशय भव्यदिव्य पद्धतीने पार पडला. सेंट्रल रेल्वे ऑफिसर्स क्लब हॉल, माटुंगा येथे झालेल्या या करिअर फेअरमध्ये विविध शाळांतील आणि NGO मधील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी करिअर मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. शैलेन्द्र गस्ते आणि श्री. सुर्यकांत देशपांडे यांनी विशेष उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
संकल्पपूर्तीमध्ये माजी विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान
या करिअर फेअरच्या यशामध्ये मसूूमच्या माजी विद्यार्थ्यांचादेखील महत्त्वपूर्ण वाटा राहिला.
विशेष उल्लेख करावाच लागेल:
माजी विद्यार्थी संघटना प्रमुख आणि मसूूम ऍडव्हायझरी कमिटी सदस्य आनंद चंद्रमणी खंकाळ
मसूम माजी विद्यार्थी प्रतिनिधी ऍडव्हायझरी कमिटी सदस्य सभा शेख
या दोन्ही मान्यवरांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्रित ठेवून त्यांच्या समन्वय, नियोजन आणि मार्गदर्शनाद्वारे कार्यक्रम सुरळीत व प्रभावी रितीने पार पाडण्यासाठी अत्यंत मोलाची भूमिका बजावली. विद्यार्थ्यांना प्रेरित करणे, स्वयंसेवकांचे आयोजन, तसेच विविध स्टॉल्सवर विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणे या सर्व क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.
कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये :
• एकूण उपस्थिती : 1,222+
• विद्यार्थी सहभाग : 848 (नाईट स्कूल, डे स्कूल आणि NGO विद्यार्थी)
• संस्था सहभाग : 27 संस्था 84 प्रतिनिधी (यात 1 LGBTQAI समुदाय NGO चा सहभाग)
• स्वयंसेवक : J.P. Morgan चे 23 स्वयंसेवक + मसूूम नाईट स्कूलचे 77 माजी विद्यार्थी
• पालक व समन्वयक : 163 उपस्थित
कार्यक्रमाचे यश व उद्दिष्ट
या करिअर फेअरद्वारे विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, कौशल्य आधारित प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी, तसेच शैक्षणिक संस्थांशी थेट संवाद साधण्याची सुवर्णसंधी मिळाली. संस्थांच्या प्रतिनिधींसोबत विद्यार्थ्यांनी थेट चर्चा करून आपल्या भविष्यासंदर्भात योग्य दिशा निवडण्यास मदत मिळवली.
निकिता केतकर मॅडम,युवराज बोराडे सर यांचे नेतृत्व, प्रमुख पाहुण्यांचे प्रोत्साहन आणि मसूूमच्या माजी विद्यार्थ्यांच्या समन्वित सहकार्यामुळे हा उपक्रम केवळ कार्यक्रम न राहता विद्यार्थ्यांच्या भविष्यास आकार देणारा महोत्सव ठरला.
पुढील वर्षाचा संकल्प
मसूूम संस्थेचा संकल्प आहे की, पुढील वर्षी हा फेअर आणखी मोठ्या प्रमाणावर राबवून अधिकाधिक विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात.
मुंबई प्रतिनिधी,
आनंद चंद्रमणी खंकाळ