ताजी बातमी

मुलुंड-गोरेगाव लिंक रोडवरील अत्याधुनिक बहुअवयव प्रत्यारोपण केंद्र असलेल्या फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड यांनी पुन्हा एकदा “जीवदान” या सेवेबद्दलची आपली बांधिलकी सिद्ध केली आहे. या वर्षी हॉस्पिटलमध्ये पाच मेंदू-मृत (कॅडॅव्हर) दात्यांचे अवयवदान यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले असून, दात्यांच्या कुटुंबीयांच्या उदात्त निर्णयामुळे १७ रुग्णांना नवजीवनाची संधी मिळाली आहे.

राज्यभरातील कॅडॅव्हर अवयवदान मोहिमेत फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड हे एक सक्रिय आणि अधिकृत ट्रान्सप्लांट सेंटर म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या अवयवदानांमध्ये यकृत (Liver), मूत्रपिंड (Kidney), हृदय (Heart), फुफ्फुस (Lungs) तसेच डोळे (Cornea) , त्वचा (Skin)अशा विविध अवयवांचे तसेच टिश्यू यांचे संकलन करण्यात आले. ही संपूर्ण प्रक्रिया झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी (ZTCC), मुंबई यांच्या सहकार्याने समन्वयपूर्वक पार पडली.

फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंडचे मेडिकल डायरेक्टर डॉ. सुप्रिया अमेय म्हणाल्या, “आम्ही सर्व दात्यांच्या कुटुंबीयांचे मनःपूर्वक आभारी आहोत. सध्याच्या काळात अवयव निकामी होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असताना, अवयवदानाचे प्रमाण त्यानुसार वाढत नाही. ही तफावत कमी करण्यासाठी फोर्टिस हॉस्पिटल आणि ZTCC, मुंबई सातत्याने प्रयत्नशील आहेत.”

या अवयवदान मोहिमेमागे कार्यरत असलेली डॉ. चारुदत्त वैती (Director, Critical Care) आणि त्यांची टीम तसेच सिनियर ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर मिस ज्योती कराडकर तसेच त्यांची टीम या दुःखी कुटुंबीयांना अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगतात आणि त्यांच्या भावनांना योग्य दिशा देतात , अत्यंत संवेदनशीलता, कायदेशीर पारदर्शकता आणि वैद्यकीय तंतोतंतता राखून ही प्रक्रिया पूर्ण केली. या कार्यात सर्व नर्सिंग स्टाफ, हॉस्पिटल मॅनेजमेंट, सिक्युरिटी स्टाफ यांचे योगदानही मोलाचे आहे.

या यशस्वी प्रयत्नांमुळे फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड यांनी अवयवदान जनजागृती मोहिमेत नेतृत्व कायम राखले आहे. फोर्टिसचा मल्टी-ऑर्गन ट्रान्सप्लांट प्रोग्राम अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी शल्यचिकित्सक, अ‍ॅनेस्थेटिस्ट, नेफ्रॉलॉजिस्ट, हिपॅटॉलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट आणि प्रशिक्षित कोऑर्डिनेटर्स यांच्या सहकार्याने चालवला जातो.

फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड नागरिकांना आवाहन करते की 

“मृत्यूनंतरही अवयवदानाच्या माध्यमातून अनेकांना नवजीवन देऊन आपण खऱ्या अर्थानं अमर होऊ शकतो.

*अवयवदान हेच जीवनाचं सर्वात श्रेष्ठ दान!”*


मुंबई प्रतिनिधी,

आनंद चंद्रमणी खंकाळ

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात