सायन-कोळीवाडा विधानसभा : भाजप युवा मोर्चाच्या वतीने ‘आवाज मुंबईकरांचा… संकल्प भाजपचा!’ उपक्रमाला प्रारंभ : राहुल लक्ष्मण जाधव (भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मिडिया द म मुंबई)
मुंबई | भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, सायन-कोळीवाडा विधानसभा यांच्या वतीने मुंबईतील सर्वांगीण विकासासाठी नागरिकांचा थेट सहभाग निश्चित करण्याच्या उद्देशाने ‘आवाज मुंबईकरांचा… संकल्प भाजपचा!’ हा विशेष जनसंपर्क व नोंदणी उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या अभियानामध्ये मुंबईतील नागरिकांकडून त्यांच्या गरजा, सूचना आणि विकासाविषयीच्या प्रस्तावांची माहिती संकलित करण्यासाठी QR कोडच्या माध्यमातून ऑनलाईन फॉर्मची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी हा QR कोड स्कॅन करून आपल्या भागातील समस्या व अपेक्षा थेट नोंदवता येणार आहेत.
हा उपक्रम गुरुवार, ६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता, SIES कॉलेज, सायन (वेस्ट), मुंबई-२२ येथे सुरू करण्यात येणार आहे.
या संकल्प उपक्रमाचे आयोजन भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल लक्ष्मण जाधव (मीडिया प्रमुख), जिल्हा सचिव प्रिन्स पटवा, सायन-कोळीवाडा विधानसभा संयोजक योगेश्वर नायक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.
भाजपा युवा मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले की,
> “मुंबईच्या विकासाचा रोडमॅप जनतेच्या थेट सहभागातून तयार करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. मुंबईकरांचा आवाज सत्तेपर्यंत पोहोचवणे आणि त्यावर कार्यवाही करून प्रत्यक्ष परिणाम निर्माण करणे हेच आमचे ध्येय आहे.”