मुंबई मनपा कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे ७७ वे अधिवेशन उत्साहात संपन्न
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के.ई.एम. रुग्णालयातील CVTC सभागृहामध्ये मुंबई मनपा कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे ७७ वे अधिवेशन अत्यंत उत्साहात पार पडले.
या अधिवेशनास माजी आयुक्त तथा महासंचालक, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था डॉ. जयराज फाटक यांनी मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती लावली. तसेच म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना चे उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांना विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा मान देण्यात आला.
अधिवेशनामध्ये मनपा कर्मचाऱ्यांच्या हक्कांच्या संरक्षणाबाबत, सेवा सुविधा, भविष्यकालीन धोरणे व प्रशासनाशी संवाद प्रक्रिया अधिक मजबूत करण्यासंदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली.
या महत्त्वपूर्ण अधिवेशनासाठी ज्येष्ठ, अभ्यासू आणि तळमळीचे कामगार नेते ॲड. प्रकाश देवदास यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या सकारात्मक नेतृत्वामुळे अधिवेशन यशस्वीरीत्या पार पडले. अधिवेशनामध्ये उपस्थित मान्यवर व सहभागी सर्वांनी ॲड. देवदास यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.