ताजी बातमी

मुंबई उपनगर जिल्ह्यातील अंधेरी परिसरात टॉयलेट फ्लश टँकमध्ये मतदानासाठी वापरले जाणारे मतदार ओळखपत्र सापडल्याचा दावा काही मुद्रित व इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांतून करण्यात आला. या संदर्भातील व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावरून घेतल्याचे संबंधित माध्यमांनी स्वतः स्पष्ट केले असून, प्रसारित क्लिपमधून घटनेचे वास्तव किंवा स्थान स्पष्ट होत नसल्याची माहिती प्रशासनाने दिली.

प्राप्त तक्रारींची पडताळणी करताना ही घटना नेमकी कुठे घडली याचा कोणताही ठोस पुरावा मिळू न शकल्याने, २० नोव्हेंबर २०२५ रोजी डी. एन. नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाची पुढील सखोल चौकशी करण्यात येणार असून, संबंधित व्हिडीओ क्लिप किंवा घटनेबाबत जर कोणत्याही नागरिकांकडे ठोस माहिती अथवा पुरावा असल्यास त्यांनी ते प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात