गुरुनानक जयंतीनिमित्त खालसा कॉलेजमध्ये शिवसेना उपनेते मा. खासदार राहुल शेवाळे यांची उपस्थिती
माटुंगा | गुरुनानक जयंतीच्या पावन पर्वानिमित्त माटुंगा येथील खालसा कॉलेजमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शिवसेना उपनेते व मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघाचे मा. खासदार राहुल शेवाळे यांनी उपस्थित राहून श्री गुरुनानकदेव जींचे आशीर्वाद घेतले.
या प्रसंगी बोलताना खासदार राहुल शेवाळे म्हणाले की, "गुरुनानकदेव जींचे विचार हे संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहेत. समानता, बंधुता, सेवा आणि सद्भाव यांचा त्यांनी दिलेला संदेश आजच्या समाजजीवनात अगदी उपयुक्त आहे. त्यांच्या शिकवणीमुळे समाजात प्रेमाची आणि एकात्मतेची भावना दृढ राहते."
कार्यक्रमात कीर्तन, शबदगायन तसेच गुरू का लंगर यांचेही आयोजन करण्यात आले होते. स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साहात गुरुनानक जयंती साजरी केली.