ताजी बातमी

मुंबई : दक्षिण विभागांतर्गत वरळी परिसरातील “रॉयल पॅलेस” समोरील अनधिकृत ब्रॅण्डिंग बोर्डाविरुद्ध दाखल झालेल्या तक्रारीवर अखेर महानगरपालिकेने कारवाई केली आहे. दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी दाखल झालेल्या या तक्रारीवर जवळपास एक वर्षानंतर निकाल लागल्याने तक्रारदार रुपेशभाई थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दक्षिण मुंबई जिल्हा सरचिटणीस, यांनी महानगरपालिकेचे आभार व्यक्त केले आहेत.


थोरात म्हणाले, “सदर अनधिकृत जाहिरात फलकावर महानगरपालिकेने आवश्यक ती कारवाई केली आहे, याबद्दल मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.”


तथापि, त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींवर होणाऱ्या दिरंगाईबद्दल नाराजीही व्यक्त केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, “सर्वसामान्य नागरिकांनी केलेल्या तक्रारींवर महानगरपालिका तात्काळ कार्यवाही करण्याऐवजी वारंवार विलंब करते, ज्यामुळे जनतेला न्याय मिळविण्यास बराच वेळ लागतो.”


कायद्यानुसार, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1888 मधील कलम 328, 328(A) आणि 328(B) नुसार अनधिकृत जाहिरात फलक उभारणे हा गुन्हा आहे आणि त्यावर तात्काळ कारवाई करणे महानगरपालिकेची जबाबदारी आहे.


तसेच, नागरिकांना वेळेत सेवा मिळावी हा त्यांचा मूलभूत अधिकार असून, भारतीय संविधानातील अनुच्छेद 14 (कायद्यापुढे सर्व समान) व अनुच्छेद 21 (जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क) नुसार तात्काळ न्याय मिळणे आवश्यक असल्याचेही थोरात यांनी नमूद केले.


शेवटी थोरात यांनी विनंती केली की, “पुढील काळात अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामे किंवा जाहिरात फलकांबाबत नागरिकांकडून तक्रार प्राप्त होताच महानगरपालिकेने त्वरित आणि कार्यक्षम कारवाई करावी.”


वरळी प्रतिनिधी

आनंद चंद्रमणी खंकाळ

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात