ताजी बातमी

चेंबुर पो ठाण्यास नेमणूकीस असलेले ASI संपत दत्तात्रय गाढवे,  वय 58 वर्षे  यांचे माहे फेब्रुवारी 2019 मध्ये घशाचे कॅन्सरचे ऑपरेशन झाले होते. ते दि. 31/05/2020 रोजी सेवानिवृत्त होणार होते.

          दि. 30/03/2020 रोजी स्टोअर चे पो हवा. तुपारे हे 12.00 वा. चे सुमारास कर्तव्यास आले असता ASI गाढवे यांनी स्टोअर रूममध्ये लोखंडी ॲगलला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आले. म्हणून लागलीच त्यांना अधिकारी व अंमलदारांनी खाली उतरवून उपचारार्थ राजावाडी हाॅस्पीटल येथे नेण्यात आले. डॉ. हिंगे यांनी त्यांना 12.45 वा. दाखलपूर्व मयत घोषित केले.

          ASI गाढवे यांच्या शर्टच्या खिशात सुसाईड नोट मिळून आली असून त्यांनी कॅन्सरचे आजाराने आत्महत्या करित असल्याचे नमूद केले आहे.

          अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास करीत आहोत. 


सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात