राज्य आणि जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यासंदर्भात तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी राज्य आणि जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत गरजूंना निवारागृह, पाणी, अन्नधान्य तसेच भोजन व्यवस्था आणि वैद्यकीय सेवा अशा सुविधा स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने उपलब्ध करून देण्यासाठी या समित्या त्यांच्या स्तरावर नियंत्रणाचे काम करतील. राज्य शासनाने याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित केला आहे. मुख्य सचिव हे राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष आहेत. अपर मुख्यस सचिव (महसूल), अपर मुख्य सचिव (नगरविकास), प्रधान सचिव (अन्न व नागरी पुरवठा), प्रधान सचिव (सहकार), प्रधान सचिव (कामगार) हे सदस्य असून आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन हे सदस्य सचिव आहेत.