ताजी बातमी

मुंबई : बहिणीची छेड काढणाºयाची हत्या केल्याचा प्रकार कांदिवली परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नरेश सोनी या तरुणाला अटक केली आहे. कांदिवली पश्चिमेच्या गणेशनगर परिसरात तो राहतो. त्याच्या २० वर्षीय बहिणीला अजय विश्वकर्मा नावाचा तरुण त्रास देत होता. तो सतत तिचा पाठलाग करायचा आणि तिला वारंवार लग्नाचा प्रस्ताव देत होता. मात्र, ती त्याला विरोध करत होती.
तिने नकार देऊनही तो तिचा पाठलाग करत असल्याने कंटाळून तिने हा प्रकार तिचा लहान भाऊ नरेश याला सांगितला. ते ऐकून
चिडलेल्या नरेशने अजयला त्याच्या घराजवळ गाठत बेदम मारहाण केली. यात अजय गंभीर जखमी झाला.

त्याला स्थानिकांनी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याची प्रकृती खालावल्याने त्याला परळच्या केईएम रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयाने याबाबत पोलिसांना कळविले. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी नरेशविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात