मुंबईत पावसाचा जोर ओसरला
साधारण गेल्या आठवडाभरापासून सुरु असणाऱ्या पावसाने गेल्या तीन दिवसांपासून चांगलाच जोर पकडला आहे. शुक्रवारपासून सुरु असणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबई, ठाणे, कोकण परिसराला झोडपलं आहे. शनिवारी रात्रीपासूनही मुंबईसह उपनगरांत पावसाची संततधार असल्यामुळे सखल भागांत पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान पावसाची सद्यस्थिती पाहता मध्य रेल्वेची वाहतून पूर्णपणे ठप्प झाली आहे. तर, पश्चिम रेल्वे मात्र सुरळीत सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबईत पावसाचा जोर ओसरला. साचलेलं पाणीही ओसरण्यास सुरुवात.
रविवारीसुद्धा पावसाचा जोर कायम राहणार असून, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.