थायलंडच्या मंदिरात विराजमान होणार ‘दगडूशेठ’ची प्रतिकृती
श्रीमंत दगडूशेठ हलवाई
गणपती
हे
सर्व
गणेशभक्तांचे
श्रद्धास्थान.
लाडक्या
बाप्पाचे
दर्शन
परदेशातही
घडावे,
यासाठी
थेट थायलंडमधील मंदिरात
हुबेहूब
दगडूशेठ
बाप्पांसारखी
मूर्ती
विराजमान
होणार
आहे.
ही
मूर्ती
साडेचार
फुटांची
असून
फायबरमध्ये
बनवली
आहे.
नीलेश
पारसेकर
यांनी
ही
मूर्ती
बनवली
आहे.
मुखेडकर
यांनी
ही
मूर्ती
रंगवली
आहे.
नितीन
करडे
यांनी
मुकुट,
परशू,
कान,
शुण्डाभूषण,
गळ्यातील
हार
असे
विविध
दागिने
बनविले
आहेत.
मूर्ती
काल थायलंडला रवाना
झाली.
दगडूशेठ
गणपती
हा
देश-परदेशातील
भक्तांचा
लाडका
बाप्पा
आहे.
परदेशातून
येणाऱ्या पाहुण्यांनाही बाप्पाचे दर्शन घेण्याची
नेहमीच
ओढ
असते.
त्यामुळे
नागरिकांच्या
पुढाकाराने
थायलंडमधील
बँकॉक येथील
लक्ष्मी-नारायण
मंदिरामध्ये
गणपतीचे
मंदिर
बांधून
तेथे
या
हुबेहूब
दगडूशेठ
गणपतीसारख्या
मूर्तीची
प्रतिष्ठापना
होणार
आहे.
थायलंडच्या
नागरिकांमध्ये दगडूशेठ बाप्पांविषयी विशेष
प्रेम
आहे.
परंतु,
प्रत्येकालाच
पुण्यामध्ये
येऊन
बाप्पांचे
दर्शन
घेता
येत
नाही.
त्यांना
त्यांच्याच
शहरामध्ये
बाप्पाचे
दर्शन
घेता
यावे
आणि
बाप्पाची
पूजा
करता
यावी,
अशी
थायलंडवासीयांची इच्छा होती, यासाठी
या
मूर्तीची
प्रतिष्ठापना
करण्यात
येणार
आहे.
नुकतीच
दगडूशेठ
हलवाई
गणपती
मंदिरामध्ये
या
मूर्तीची
विधिवत
पूजा
करण्यात
आली.