ताजी बातमी

गावठी कट्टे बाळगणाऱ्याला ठोकल्या बेड्या

2 गावठी कट्टयांस 6 काडतुसा जप्त


     गावठी कट्टे बाळगणाऱ्या इसमाला  बेड्या ठोकण्यात आल्या. ही उत्तम कामगिरी एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस निरीक्षक दया नायक यांनी केली. या आरोपींकडून 2 गावठी कट्टे व 6 जिवंत काडतुसा जप्त करण्यात आल्या आहेत. या आरोपीला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

     खार पश्चिम परिसरातील मारुती गल्ली येथे एक इसम शस्त्र घेऊन येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दया नायक यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे अपर पोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, उपायुक्त परमजीत सिंग दहिया, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप काळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दया नायक, पोलीस उपनिरीक्षक काटकर व पथकाने सापळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार चेतन चंदू पटेल (29) तेथे आला. त्याच्या संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, 2 गावटी कट्टे, 6 जिवंत काडतुसा आढळून आल्या. 

या प्रकरणी (गु. र. क्र. 88/99) भारतीय हत्यार कायदा 3, 25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(अ) नुसार गुन्हा दाखल करून पटेल याला अटक केली.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात