ताजी बातमी

नागपुरात पारा सध्या ४५ अंशांवर येऊन ठेपल्यानं त्याचा परिणाम सामान्य जनजीवनावरही पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर उष्णता वाढल्यानं डांबरी रस्त्यांवरही त्याचे परिणाम दिसून येत आहेत

नागपूरच्या आकाशवाणी चौकात काही आठवड्यांपूर्वी डांबरीकरण करण्यात आलं. मात्र हे डांबरीकरण करताना आवश्यक असलेल्या खडीचं मिश्रण करता केवळ डांबरच रस्त्यावर टाकण्यात आलं. कमालीच्या उष्णतेमुळे हे डांबर आता बऱ्याच प्रमाणात वितळत असल्यानं, चौक पार करताना पायी चालणाऱ्यांची चांगलीच कसरत होत आहे. चपला डांबरी रस्त्याला चिकटत आहेत, तर वाहनांच्या टायरचे ठसेही रस्त्यावर उमटत आहेत

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात