चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस, राजकीय तोफा थंडावणार
६० हजारांहून अधिक पोलीस सज्ज; चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी
गेले दोन महिने आरोप्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडल्यावर आज संध्याकाळी महाराष्ट्रात निवडणुकीचा जाहीर प्रचार संपणार आहे. येत्या सोमवारी लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. या टप्प्यात राज्यातली १७ मतदारसंघात मतदान होणार आहे. या सर्वच ठिकाणी आज प्रचार संपणार आहे. मतदारांपर्यंत पोहचण्याची अखेरची संधी असल्याने आज सगळ्या पक्षाच्या उमेदवारांनी आपापल्या स्टार प्रचारकांना मैदानात उतरवण्याचा कार्यक्रम आखला आहे. यापैकी मुंबईतली मुख्यमंत्र्यांच्या रोड शो कडे साऱ्यांच्या नजरा असणार आहेत.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.