ताजी बातमी

पाण्याची बाटली दिली नसल्याचा राग मनात धरून हॉटेलचालकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. सोमवारी सायंकाळी गारखेडा भागातील रिलायन्स मॉलजवळ हा प्रकार घडला. याप्रकरणी दोन संशयित आरोपींना पुंडलिकनगरपोलिसांनीअटककेलीआहे. 

बंडू शेळके (वय ३२ रा. भवानीनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शेळके यांची रिलायन्स मॉलजवळ चहाची टपरी आहे. सोमवारी सायंकाळी रवी तायडे आणि अभिजित चव्हाण (दोघे रा. गजानननगर) हे दोन मद्यपी त्यांच्या टपरीवर आले होते. या दोघांनी पाण्याची बाटली शेळके यांना मागितली. शेळके यांनी नकार दिल्याने या दोघांनी त्यांच्यावर चाकूने वार केले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या शेळके यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर एपीआय घनश्याम सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयित आरोपी तायडे आणि चव्हाणचा शोध घेत त्यांना तत्काळ अटक करण्यात आली. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत पुंडलीकनगर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात