परिवर्तनाची लाट निर्माण झाली आहेः शरद पवार
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. जळगाव लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ महात्मा फुले हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. सभेस मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शरद पवार यांनी देशात परिवर्तन करण्याची गरज असल्याचे सांगितले. केंद्र सरकारच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत शेतकऱ्यांच्या सर्वांधिक आत्महत्या झाल्याचा आरोप त्यांनी केला. कृषी मालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना केंद्र सरकार या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे. मी कृषी मंत्री असतांना शेतकऱ्यांचे सुमारे ७१ हजार कोटी रुपयांचे कर्ज सरसकट माफ करून व्याज दर १२ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आणला. सद्य स्थितीत देशासमोर अनेक समस्या असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझ्या परिवाराची चिंता लागली आहे. माझ्या परिवाराची चिंता करण्यापेक्षा लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी या भाजपच्या जेष्ठ नेत्यांची चिंता करावी, असा उपरोधिक टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.