ताजी बातमी

Committed Communities Development Trust (CCDT) संस्थेच्या “पहल” SRHR प्रकल्पांतर्गत धारावी व दहिसर धारखाडी येथील चेंज लीडर्स तसेच CLCP प्रकल्पांतर्गत बोरिवली गणपत पाटील नगरमधील कम्युनिटी चॅम्पियन्स यांच्या सहभागातून येणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांना भेट देऊन बाल जाहीरनामा सादर करण्यात आला.

दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी या उपक्रमांतर्गत धारावी व दहिसर येथील किशोरवयीन मुलींनी आपल्या परिसरातील उमेदवारांशी थेट संवाद साधला. या भेटीत मुलींनी स्वतः तयार केलेला “बाल जाहीरनामा (Children’s Manifesto)” उमेदवारांसमोर मांडत स्थानिक पातळीवरील गंभीर सामुदायिक समस्या प्रभावीपणे मांडल्या.

 धारावी – वॉर्ड क्रमांक १८६

या विभागात चेंज लीडर्सनी खालील उमेदवारांना बाल जाहीरनामा सादर केला :

अर्चना शिंदे (उबाठा शिवसेना / मनसे गट)

नीला सोनवणे (भाजप – शिंदे गट)

माधुरी गायकवाड (अपक्ष)

सदिच्छा शिंदे (काँग्रेस)

या जाहीरनाम्यात उघडी व तुटलेली गटारे, स्वच्छ सार्वजनिक शौचालयांचा अभाव, अनियमित पाणीपुरवठा, अपुरी कचरा उचल व्यवस्था, रस्त्यावरील अपुरी प्रकाशयोजना व पावसाळ्यातील पाणी साचणे या महत्त्वाच्या समस्या मांडण्यात आल्या.

 दहिसर विभाग – वॉर्ड क्रमांक ३

दहिसर विभागातील चेंज लीडर्सनी पुढील उमेदवारांना भेट देत बाल जाहीरनामा सादर केला :

चौथी प्रसाद गुप्ता (समाजवादी पार्टी)

मनोज बामणे (अपक्ष)

यामध्ये समता नगर व डोंगरी भागातील गटर अडथळे, शंकर मंदिर डोंगरी, अँथनी चाळ व केतकी पाडा परिसरातील सार्वजनिक शौचालयांची अपुरी स्वच्छता, पाणी व वीजपुरवठ्याअभावी बंद असलेले दिवे, तसेच रात्री महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ठळकपणे मांडण्यात आला.

या समस्या किशोरवयीन मुली व महिलांच्या आरोग्य, सुरक्षितता व सन्मानाशी थेट निगडीत असून, संपूर्ण समुदायाच्या कल्याणावर त्याचा गंभीर परिणाम होत असल्याचे चेंज लीडर्सनी स्पष्ट केले.

सर्व उमेदवारांनी बाल जाहीरनामा काळजीपूर्वक वाचून समजून घेतला आणि निवडून आल्यास या समस्या सोडवण्याची जबाबदारी स्वीकारत सकारात्मक आश्वासन दिले.

हा उपक्रम बाल सहभाग, लोकशाही मूल्ये आणि जबाबदार स्थानिक प्रशासन यांना बळकटी देणारा ठरला असून, निर्णय प्रक्रियेत मुलांच्या आवाजाला स्थान देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे व प्रेरणादायी पाऊल ठरले आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात