ताजी बातमी

पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रतीक्षा नगर येथील संक्रमण शिबिरांमध्ये वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना सुरक्षित व नियमित गॅसपुरवठ्याअभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. घराघरात गॅस पाईपलाईन नसल्यामुळे नागरिकांना सिलिंडरवर अवलंबून राहावे लागत होते. सिलिंडर अचानक संपल्यास स्वयंपाकाची गैरसोय, अतिरिक्त खर्च आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत होता. त्यामुळे सुरक्षित, सोयीस्कर आणि परवडणारी गॅस सुविधा ही येथील नागरिकांची अत्यंत महत्त्वाची गरज बनली होती.

ही गरज लक्षात घेऊन शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व सातत्यपूर्ण मार्गदर्शनाखाली या परिसरातील नागरिकांसाठी गॅस पाईपलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर या प्रयत्नांना यश आले.

 प्रभाग क्रमांक १७३ चे शिवसेना नगरसेवक मा. रामदास देविदास कांबळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तसेच म्हाडा व महानगर गॅस लिमिटेड यांच्या सहकार्याने प्रतीक्षा नगर संक्रमण शिबिरात गॅस पाईपलाईन योजना सुरू करण्यात आली.दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २.३० वाजता प्रभात विश्वनाथ मित्र मंडळ टी–४४, ४५, ४६, ४७ कंपाऊंड येथे स्थानिक नागरिकांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करून शुभारंभ करण्यात आला.

या उपक्रमाअंतर्गत प्रतीक्षा नगर येथील संक्रमण शिबिरातील इमारत क्रमांक टी–१ ते टी–६७, जुनी इमारत क्रमांक २ ते ६ तसेच बहुमजली इमारत क्रमांक १ ते २० मधील नागरिकांना घरोघरी गॅस पाईपलाईन कनेक्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सुविधेमुळे संक्रमण शिबिरातील नागरिकांना सुरक्षित, नियमित व अखंड गॅसपुरवठा मिळणार असून वेळ, पैसा आणि श्रमांची मोठी बचत होणार आहे.

नागरिकांची दैनंदिन गरज ओळखून त्यावर ठोस उपाय करणाऱ्या या लोकउपयोगी व जनहितकारी उपक्रमाबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत शिवसेना नगरसेवक मा. रामदास देविदास कांबळे तसेच सर्व सहकार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणारी आणि सर्व कुटुंबांना फायदेशीर ठरणारी ही योजना शिवसेनेच्या लोकाभिमुख कार्याची ठळक साक्ष ठरत आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात