रिपब्लिकन पक्ष (खोरीपा) चे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र काशीराम मांजलकर यांच्या पाठपुरावाला यश मनपाने घेतली तक्रारीची तात्काळ दखल वाहतूकदार व शालेय विद्यार्थ्यांना दिलासा
रिपब्लिकन पक्ष (खोरीपा) चे दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष राजेंद्र काशीराम मांजलकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, संबंधित रस्त्यावरील वाहतूक व सुरक्षेच्या तक्रारीची मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेतली आहे.
सदर ठिकाणी रस्त्यावर असलेल्या धोकादायक दुभाजकामुळे वाहतूक कोंडी होण्यासह अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. विशेषतः या मार्गावरून जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना व स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही गंभीर बाब लक्षात घेऊन राजेंद्र काशीराम मांजलकर यांनी मनपा प्रशासनाकडे लेखी निवेदन देत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली होती.
तक्रारीची गंभीरता ओळखून मनपाच्या संबंधित विभागाने तत्काळ पाहणी करत आवश्यक बदल करण्यास सुरुवात केली. यामुळे आता वाहतूकदारांसाठी रस्ता अधिक सुरक्षित व सोयीस्कर झाला असून, शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करताना सुरक्षित वळणाची सुविधा उपलब्ध झाली आहे.
या लोकहितकारी कार्यामुळे परिसरातील नागरिक, वाहनचालक तसेच पालक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने वेळेत घेतलेल्या निर्णयामुळे अपघाताची शक्यता कमी होऊन वाहतुकीचा प्रवाह सुरळीत झाला आहे.
लोकहितासाठी सातत्याने आवाज उठवणाऱ्या रिपब्लिकन पक्ष (खोरीपा) च्या या यशस्वी पाठपुराव्याचे सर्वत्र स्वागत होत आहे या पाठपुराव्या करिता तालुका अध्यक्ष गणेश चंद्रकांत साठे वॉर्ड अध्यक्ष १७६ किशन देवी शर्मा आणि वॉर्ड उप अध्यक्ष विठ्ठल मोहिते यांचे मोलाचे सहकार्य लाभले