ताजी बातमी

सायन–कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातील प्रतिक्षा नगर, वॉर्ड क्रमांक १७३ येथे सौ. वैशाली विजय पगारे यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणारे लोकोपयोगी जनहित शिबिर नागरिकांसाठी एक मोठा दिलासा ठरत आहे. समाजातील सर्वसामान्य, गरजू, कामगार, ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळावा, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.


या शिबिरामध्ये आयुष्यमान कार्ड, ई-श्रम कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड, अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, पॅन कार्ड तसेच आधार कार्ड नवीन/दुरुस्ती/अपडेट अशा अत्यावश्यक कागदपत्रांसाठी सुलभ, पारदर्शक व कमी शुल्कात सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. विशेष म्हणजे प्रथम १००० स्थानिक रहिवाशांना स्मार्ट कार्ड मोफत देण्यात येणार असून ही बाब नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक ठरत आहे.


“आपले सरकार – आपल्या दारी” या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करत, नागरिकांना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी सौ. वैशाली विजय पगारे सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक नागरिकांना वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाचत असून शासनाच्या योजनांचा थेट लाभ मिळत आहे.


सामाजिक बांधिलकी जपत, राजकारणाला सेवाभावाची जोड देणाऱ्या सौ. वैशाली विजय पगारे यांचे कार्य आज जनतेच्या मनात घर करत असून, त्या खऱ्या अर्थाने लोकप्रिय, प्रेरणादायी आणि जनहितासाठी झटणाऱ्या नेत्या म्हणून ओळख निर्माण करत आहेत. नागरिकांकडून त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात