ताजी बातमी

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनचे नाव आता अधिकृतपणे ‘महाराष्ट्र लोकभवन’ असे करण्यात आले आहे. महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी यासंदर्भात राजभवन सचिवालयाला आवश्यक निर्देश दिले आहेत.

राजभवन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि लोककल्याणाशी निगडित करण्याच्या उद्देशाने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरेल, असे राज्यपालांनी सांगितले. लोकांच्या सहभागातून शासनप्रणाली बळकट करण्यासाठी ‘लोकभवन’ ही संकल्पना उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यपालांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेनुसार, ‘लोकभवन’ हे आता फक्त राज्यपालांचे निवासस्थान किंवा कार्यालय न राहता राज्यातील नागरिक, विद्यार्थी, संशोधक, शेतकरी, नागरी संस्थांचे प्रतिनिधी आणि समाजातील विविध घटकांशी संवादाचे केंद्र बनणार आहे.

लोकभवन हे सरकार आणि जनतेमध्ये सेवा, सहकार्य व संवादाचा सेतू व्हावे, हीच नामांतरामागची भूमिका आहे,” असे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नमूद केले.

यापुढे ‘लोकभवन’ हे संवैधानिक कर्तव्यांपलीकडे जाऊन समाजाच्या आशा-आकांक्षा, समस्या आणि अपेक्षांशी संवेदनशील राहून नागरिकांशी थेट नाते जपणारे केंद्र ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात