ताजी बातमी

शीव (सायन) उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीला गती; ३१ मे २०२६ अंतिम मुदत

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार कामांच्या गतीत वाढ

पोलीस सह आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे यांच्या उपस्थितीत प्रकल्पाचा आढावा

महानगरपालिका – वाहतूक पोलीस – रेल्वे विभागांची संयुक्त बैठक

शीव (सायन) उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणी कामांची गती वाढवून ही कामे ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. नागरिकांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी सर्व विभागांनी प्रभावी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी उड्डाणपूल प्रकल्पाची प्रगती तपासण्यासाठी आयोजित बैठकीत श्री. बांगर आणि पोलीस सह आयुक्त (वाहतूक) श्री. अनिल कुंभारे यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला. या बैठकीला महानगरपालिकेचे उप आयुक्त (पायाभूत सुविधा) श्री. गिरीश निकम, प्रमुख अभियंता (पूल) श्री. उत्तम श्रोते, उपप्रमुख अभियंता श्री. राजेश मुळ्ये तसेच मध्य रेल्वेचे उप मुख्य अभियंता (निर्माण) श्री. रोहित मेहला उपस्थित होते.

कामांची सद्यस्थिती व पुढील वेळापत्रक


अतिरिक्त आयुक्त श्री. बांगर यांनी कामांची प्रगती स्पष्ट करताना सांगितले—

LBS रोडवरील भुयारी मार्ग — डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण

धारावी बाजूचा भुयारी मार्ग — फेब्रुवारी २०२६ अखेर पूर्ण

रेल्वे पुलाच्या उत्तर बाजूचे गर्डर लाँचिंग — मार्च २०२६, पहिला आठवडा

दक्षिण बाजूचे गर्डर लाँचिंग — एप्रिल २०२६, पहिला आठवडा

धारावी व LBS रोडकडे जाणारे पोहोच रस्ते — १५ एप्रिल २०२६ पर्यंत

पूर्व बाजूचा पोहोच रस्ता — ४५ दिवसांत पूर्ण करण्याचे लक्ष

पूल संपूर्णतः पूर्ण — ३१ मे २०२६

पूल वाहतुकीसाठी खुला — १ जून २०२६

गर्डर निर्मितीसाठी विशेष देखरेख

गर्डर निर्मिती नागपूर आणि अंबाला येथे सुरू असून, गुणवत्तेची व वेळेची काटेकोरपणे पूर्तता व्हावी यासाठी महानगरपालिकेचे प्रतिनिधी दोन्ही ठिकाणी सतत उपस्थित राहणार आहेत. तुळया वेळेवर उपलब्ध करून देणे आणि फॅब्रिकेशन प्रक्रियेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारीही त्यांच्याकडे देण्यात आली आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी समन्वयावर भर

कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका, रेल्वे आणि वाहतूक विभागांनी एकत्रितपणे कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे श्री. बांगर यांनी अधोरेखित केले. नागरिकांना होणारी असुविधा लवकरात लवकर कमी करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.


सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात