ताजी बातमी

१ डिसेंबर रोजी CCDT तर्फे मुंबई रेल्वे पोलिसांच्या सहकार्याने जागतिक एड्स दिन (World AIDS Day) निमित्त स्वाक्षरी अभियानाचे आयोजन करण्यात आले. २०२५ च्या थीमनुसार आयोजित केलेले हे अभियान हे SRHR (Sexual and Reproductive Health and Rights) या उपक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग असून, किशोरवयीन मुलांनी समाजात जागृती निर्माण करण्यामध्ये निभावलेली भूमिका विशेषत्वाने अधोरेखित करण्यात आली.

या अभियानाचा उद्देश लोकांमध्ये HIV या आजाराविषयी विषयी जागरूकता वाढवणे, तसेच एचआयव्हीग्रस्त बालक तसेच त्यांना जो भेदभाव सहन करावा लागतो या भेदभावाबद्दल भूमिका मांडणे. यासाठी समाजाने सामूहिकपणे जबाबदारी स्वीकारून एक संवेदनशील, माहितीपूर्ण आणि सर्वसमावेशक वातावरण निर्माण करावे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमाला महत्वाच्या मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यामध्ये—

शहाजी अकरम निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बांद्रा रेल्वे पोलीस स्थानक

श्रीमती सुकन्या पोद्दार, मॅनेजिंग ट्रस्टी, सी सी डी टी संस्था


कॅरन थॉम्पसन, ब्रॅण्ड डायरेक्टर, M·A·C Cosmetics India

श्री दीपक त्रिपाठी, चाइल्ड प्रोटेक्शन आणि HIV प्रोग्राम प्रमुख, सी सी डी टी 


यांच्या उपस्थितीने अभियानाला अधिक बळ आणि दिशा मिळाली.

या उपक्रमाद्वारे समाजातील प्रत्येक घटकाने HIV बद्दल तथ्याधारित माहिती प्रसारित करून भेदभावमुक्त आणि आरोग्यसंपन्न समुदाय घडवण्यासाठी पुढे यावे, असे सर्वांना आवाहन करण्यात आले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात