ताजी बातमी

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे पोक्सो (Protection of Children from Sexual Offences Act) कायद्याविषयी जागरूकता वाढविण्यासाठी व्यापक मोहिमेची अंमलबजावणी करण्यात आली. मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय विभागांमधील महापालिका शाळांत इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना ‘अभया’ या विशेष नाटिकेद्वारे गुड टच-बॅड टच, आत्मसंरक्षण, प्रसंगावधान, योग्य प्रतिक्रिया आणि कायदेशीर संरक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी आणि शिक्षण उपआयुक्त डॉ. प्राची जांभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मीना नाईकस् क्रिएटिव वर्कशॉपतर्फे सादर होणारी ही संवादात्मक नाटिका मुलांमध्ये लैंगिक समानता आणि महिलांच्या आदराबाबतही जागरूकता निर्माण करते.

२५ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२५ या कालावधीत कार्यक्रमाचे सादरीकरण नियोजित असून आतापर्यंत १९ प्रयोगांद्वारे १० ते १२ हजार विद्यार्थ्यांपर्यंत जनजागृती पोहोचली आहे. पुढील टप्प्यात आणखी चार हजार विद्यार्थ्यांपर्यंत ही मोहीम पोहोचविली जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी सुजाता खरे यांनी दिली.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात