ताजी बातमी

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, दादर तसेच छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) परिसरात मोठ्या प्रमाणात अनुयायी दाखल होतात. याची दखल घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सोयी-सुविधांची व्यापक तयारी सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसराला भेट देऊन सुरू असलेल्या पूर्वतयारीचा सखोल आढावा घेतला. अनुयायांसाठी शौचालय व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता, वैद्यकीय सुविधा, तात्पुरती निवारा व्यवस्था, दिशादर्शक फलक, नियंत्रण कक्ष आदी सर्व सेवांची काटेकोर व वेळेवर उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले.

यावेळी उपायुक्त (परिमंडळ–२) श्री. प्रशांत सपकाळे, सहायक आयुक्त (जी उत्तर) श्री. विनायक विसपुते यांसह संबंधित विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. महानगरपालिकेकडून अनुयायांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा उच्च दर्जात उपलब्ध करून देण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू असल्याचे स्पष्ट झाले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात