ताजी बातमी

मुंबई : रिपब्लिकन पक्ष खोरिपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भाऊ निरभवने यांच्या आदेशानुसार आणि मुंबई अध्यक्ष भागवत कांबळे तसेच मुंबई सरचिटणीस विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्षपदी राजेंद्र मांजलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मांजलकर यांच्या नियुक्तीमुळे पक्ष संघटनाला दक्षिण मध्य मुंबईत नवी ऊर्जा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण असून आगामी राजकीय घडामोडींमध्ये मांजलकर यांच्या नेतृत्वामुळे पक्ष अधिक बळकट होईल, असा विश्वास राज्य नेतृत्वाने व्यक्त केला आहे.

राजेंद्र मांजलकर यांनी विश्वास व्यक्त करत सांगितले की, “पक्षाचे ध्येय-धोरण प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवून संघटना मजबूत करण्यासाठी कटिबद्ध राहीन.”

महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाची संघटनात्मक उभारणी अधिक गतिमान करण्याच्या प्रयत्नांना त्यांच्या नियुक्तीमुळे मोठी चालना मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात