ताजी बातमी

सांगली : कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन रूग्णांवर उपचारासाठी काही खाजगी रूग्णालये कोविड रूग्णालये म्हणून घोषित व कार्यान्वित करण्यात आली होती. सद्यस्थितीत कोविड रूग्णांची संख्या कमी होत आहे व रूग्णांवर उपचारासाठी उपलब्ध खाटांची संख्या आवश्यक प्रमाणात शिल्लक राहत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीत झालेल्या चर्चेनुसार 

जिल्ह्यातील 9 रूग्णालयांना 26 ऑक्टोबर 2020 पासून नॉन कोविड रूग्णालय म्हणून सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. 

सद्यस्थितीत कोविड रूग्णालय म्हणून कार्यरत असलेल्या ज्या रूग्णालयांत कोविड रूग्णांची संख्या अतिशय कमी किंवा शुन्य आहे अशा रूग्णालयांत सद्यस्थितीत नॉन कोविड रूग्णसेवेची आवश्यकता लक्षात घेऊन नॉन कोविड रूग्णसेवा कार्यान्वीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड रूग्ण सद्यस्थिती पाहता व संभाव्य कोविडच्या दुसऱ्या लाटेमधील रूग्णांची संख्या वाढल्याचे आढळल्यास रूग्णालय पुन:श्च कोविड रूग्णालय म्हणून कार्यान्वीत करण्यात येईल या अटीस अधिन राहून 9 रूग्णालयांना नॉनकोविड रूग्णालय म्हणून कार्यान्वीत करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये डॉ. शरद घाडगे यांचे घाडगे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सांगली, डॉ. महेश दुदनकर यांचे दुदनकर हॉस्पिटल सांगली, डॉ. अनिल मडके यांचे श्वास हॉस्पिटल सांगली, डॉ. महेश जाधव यांचे अपेक्स हॉस्पिटल मिरज, डॉ. रविंद वाळवेकर यांचे भगवान महावीर कोविड हॉस्पीटल सांगली, डॉ. दिपक शिखरे यांचे लाईफकेअर हॉस्पीटल सांगली, डॉ. चोपडे यांचे दक्षिण भारज जैन समाज हॉस्पीटल सांगली, डॉ. सचिन सांगरूळकर यांचे साई मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल इस्लामपूर व डॉ. शालिवाहन पट्टणशेट्टी यांचे मयुरेश्वर हॉस्पीटल जत या रूग्णालयांचा समावेश आहे.

रूग्णालयाच्या फॅसिलीटी ॲपवरील सर्व माहिती अद्ययावत करण्यात यावी, प्रशासनाकडून व्हेंन्टिलेटर पुरवला असल्यास तो परत करावा, विहीत पध्दतीने रूग्णालयाची अंतर्गत व बाह्य स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणे करणे इत्यादी बाबींची पूर्तता करूनच नॉन कोविड रूग्णालय म्हणून सुरू करण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहेत. 

या आदेशाचे उल्लंघन केल्यास अथवा सदर कामात हलगर्जीपणा किंवा टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अन्वये व भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात