ताजी बातमी

*खासदार राहुल शेवाळे आणि श्री राधा फाऊंडेशन  च्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त सन्मान*



मुंबई, ता. 22: सुरुवातीच्या काळात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतील कायदा सुव्यवस्था राखण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या धारावी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक श्रीमती अंजली वाणी यांचा 'कोरोना रणरागिणी' पुरस्काराने सन्मान करण्यात आला. कोरोना संकटात उल्लेखनीय कार्य केलेल्या कतृत्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी, खासदार राहुल शेवाळे आणि 'श्री राधा फाऊंडेशन' यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमा अंतर्गत, श्रीमती वाणी यांना धारावी पोलीस ठाण्यात हा पुरस्कार बहाल करण्यात आला. यावेळी 'श्री राधा फाऊंडेशन'च्या अध्यक्षा सौ. कामिनी राहुल शेवाळे, धारावी विधानसभा समन्वयक श्री विठ्ठल पवार, आरोग्य समिती उपाध्यक्ष श्री वसंत नकाशे, नगरसेविका मरिअम्मल मुत्तु तेवर, उपविभाग प्रमुख जोसेफ कोळी, राजेंद्र सूर्यवंशी, प्रकाश आचरेकर धारावी महिला विभाग संघटक कविता ताई जाधव महिला उपविभाग प्रमुख माया जाधव शाखाप्रमुख श्री सतीश कटके यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. अशाच रीतीने नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसांत, आरोग्य सेविका, महिला पोलीस, परिचारिका, डॉक्टर्स यांचा सन्मान करण्यात येत आहे.

लॉकडाऊनच्या दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे महत्वाचे काम धारावी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी केले. या कामात पोलीस उपनिरीक्षक श्रीमती अंजली वाणी यांचे मोठे योगदान आहे. एम टेक ची पदवी घेऊन काही वर्षे प्राध्यापकी केल्यावर 2015 साली अंजली पोलिसदलात रुजू झाल्या. याआधी त्यांनी विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये पाणलोटक्षेत्र विकसित करण्यासाठी काम केले आहे. 

कोरोनाकाळात केंद्र आणि राज्य सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनची धारावीमध्ये यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी श्रीमती अंजली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिकिरीचे प्रयत्न केले. सलग 5 महिने एकही दिवस सुट्टी न घेता अंजली यांनी आपले कर्तव्य उत्तमरीत्या पार पाडले. विशेषतः धारावीतील परप्रांतीय मजुरांना आपल्याला राज्यात पाठविण्यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली. याशिवाय धारावीतील गरजूंना सर्वतोपरी मदत करण्यासाठी अंजली वाणी या वर्दीतल्या दुर्गेने नेहमीच पुढाकार घेतला!

नवरात्र उत्सवात आत्तापर्यंत समाजसेविका श्रीमती पद्मा कपूर, आरोग्य सेविका श्रीमती मंगला जगताप, राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या पोलीस अधिकारी श्रीमती शालिनी शर्मा, वैद्यकीय कर्मचारी श्रीमती पद्मा जोसेफ, आरोग्यसेविका श्रीमती सुवर्णा पाटील यांचा सत्कार खासदार शेवाळे आणि 'श्री राधा फाऊंडेशन'च्या वतीने करण्यात आला आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात