ताजी बातमी

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वामनराव इथापे  फार्मसी महाविद्यालयातील प्राचार्य आयुष पटेल यांच्याकडून दोन विद्यार्थिनीचा विनयभंग..

 करण्यात आला. याप्रकरणी *रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पक्षाचे मुंबई सचिव तथा महिला नेत्या मा.अनिता अलंकार जाधव* यांनी या दोन विद्यार्थ्यांना न्याय देण्याकरिता दि.१३,ऑक्टोबर २०२० रोजी संगमनेर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन सदर प्राचार्याच्या विरोधात ॲट्रॉसिटी कलमांतर्गत आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करून घेण्यात आला.या दोन विद्यार्थिनींनी जिद्द धाडस प्राचार्यांच्या विरुद्ध विनयभंगाच्या करण्याची तक्रार करण्याची दाखवल्याबद्दल त्या दोन विद्यार्थ्यांचे अभिनंदन मी करते. तसेच महिलांना किंवा विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचा विनयभंगाचा त्रास कोण देत असल्यास त्यांनी शासन दरबारी स्वतःहून जाऊन तक्रार करावी. असे आव्हान श्रीमती अनिता जाधव यांनी केली आहे.लवकरात लवकर सदर संस्थेने महाविद्यालयाने सदर प्राचार्याच्या विरोधात बडतर्फ करण्यात यावे. महाराष्ट्र सरकारने व गृहमंत्री,शिक्षण मंत्र्याने याविषयी लक्ष घालून वामनराव इथापे डी फार्मसी महाविद्यालयातील प्राचार्याला कडक शासन करावे. महाराष्ट्रातील कुठल्याही व्यक्तीने महिलावर आणि विद्यार्थ्यांवर विनयभंग करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर कडक शासन झालेच पाहिजे.ह्या दोन विद्यार्थिनींना सदर व्यक्तीच्या माणसांकडून गुंडांकडून जीवितास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सदर विद्यार्थिनींना पोलिस संरक्षण देण्यात यावे ही मागणी करण्यात येत आहे.   रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात