शिवनेरी युवा प्रतिष्ठान (रजि.) यांच्या तर्फे दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि रुग्ण शिविका लोकार्पण सोहळा
गौरव सोहळा संपन्न
शनिवार
दि. १५ ऑगस्ट २०२० रोजी
सायं. ७.३० वाजता
७४ व्या भारतीय स्वातंत्र्य दिन निमित्ताने
*शिवनेरी युवा प्रतिष्ठान, (रजि.)* यांच्या तर्फे
दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा *गुणगौरव सोहळा* आणि
*रुग्ण शिविका लोकार्पण सोहळा'*
सायन (पुर्व) प्रतिक्षा नगरातील *राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले म्युनिसिपल कामगार वसाहत* येथील *त्रिसरण बुध्द विहार* येथे आयोजित करण्यात आला होता.
ह्यावेळी स्थानिक
*राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले म्युनिसिपल कामगार वसाहत* मधील स्थानिक नागरिकांसह
*भारतीय बौध्द महासभा, शाखा: प्रतिक्षा नगर* आणि
*बौध्दजन पंचायत समिती, शाखा क्र. ६७७* चे निवडक पदाधिका-यांसह
*क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ* च्या महिला वर्गांनी उपस्थिती राखली.
ह्यावेळी सन्माननीय स्थानिक *बौध्दाचार्य दिपक जाधव गुरुजी* यांनी युवा वर्गाला संबोधित करत असताना *रुग्णशिविका लोकार्पण* उपक्रमाचे कौतुक केले.
तसेच, तालुकास्तरीय कार्यरत असणारे *आदरणीय बौध्दाचार्य जितेंद्र कांबळे गुरुजी* ह्यांनी
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विचारपूर्वक योग्य ध्येय निश्चित करून योग्य रीतीने दिशा निवड करावी सांगून करियर विषयी मार्गदर्शन केले,
युवा वर्गाच्या स्वखर्चातून निर्माण केलेल्या *रुग्ण शिबिका लोकार्पण* उपक्रमाचे कौतुक करताना सामाजिक उपक्रमातही युवा वर्गांनी पुढाकार घेऊन जाणकारांचे मार्गदर्शन घेत कोरोना महामारी काळात स्थानिक नागरी आरोग्य समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असेही युवा वर्गाला आपल्या मार्गदर्शनातून सुचित केले.
ह्यानंतर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना *प्रशस्ती पत्रक, भेटवस्तू व पुष्पगुच्छ* देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
तसेच,
*राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले म्युनिसिपल कामगार वसाहत* च्या स्थानिक संघटनेच्या कार्यकारणीसह महिला मंडळ च्या *'रुग्णशिविका'* लोकार्पण करण्यात आले.
अशा रीतीने *७४ व्या भारतीय स्वातंत्र्यदिना* चे औचित्य साधून स्तुप्त्य सोहळा संपन्न झाला.
*????????आपले नम्र,????????*
*????????शिवनेरी युवा प्रतिष्ठान (रजि.)????????*