ताजी बातमी

शेतकऱ्यांच्या पीक कर्जासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात मा. अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ज्येष्ठ नेते, आ. प्रकाशदादा सोळुंके, आ. संजय दौंड यांच्यासह जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत बँकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.


या बैठकीत पीक कर्जबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला यावेळी बैठकीत मी खालील मुद्दे आग्रहाने मांडले :


शेतकर्‍यांना पीक कर्ज देताना त्यांचा सिबिल स्कोर पाहण्यात येऊ नये.


शेतकर्‍यांना पीक कर्ज देताना इतर बँकांची व खाजगी फायनान्सची बे-बाकी मागण्यात येऊ नये.


ज्या शेतकर्‍यांची कर्जमाफी होऊन खात्यावर रक्कम जमा झालेली आहे, व त्यांच्याकडे इतर बँकेची बाकी आहे, अशा शेतकर्‍यांना तात्काळ पीक कर्ज देण्यात यावे.


ज्या शेतकर्‍यांना ज्या बँकेची कर्जमाफी आलेली आहे, अशा सर्व शेतकर्‍यांना पीक कर्ज देण्यासाठी सर्व बँकांना, सर्व नियम शिथिल करून पीक कर्ज देण्याबाबत कार्यवाही करावी.


डी. सी. सी. बँकेची बे-बाकी न मागता शेतकर्‍यांना राष्ट्रीयकृत बँकांनी पीक कर्ज वाटप करावे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात