नगरविकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे जी यांच्या उपस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महानगरपालिकेला भेट
आज नगरविकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे जी यांच्या उपस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महानगरपालिकेला भेट देऊन उल्हासनगर आणि भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला.
ज्याप्रकारे 'चेस द व्हायरस' तसेच मुंबईतील धारावीच्या धर्तीवर 'मिशन झीरो' अंतर्गत उपाययोजना करून कोरोणा नियंत्रणात आणला आहे, तशा प्रकारच्या उपाययोजना या क्षेत्रांत राबवून कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणला जाणार आहे.
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे जी, आमदार डॉ. बालाजी किणीकर जी, उल्हासनगरच्या महापौर लिलाबाई आशाण जी, उल्हासनगर महापालिका आयुक्त डॉ.राजा दयानिधी जी, भिवंडी महापालिका आयुक्त डॉ.पंकज अशीया जी उपस्थित होते.