जिल्ह्यात १२ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह; एका महिलेला डिस्चार्ज
काल रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार रिसोड तालुक्यातील १२ व्यक्तींचा कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये रिसोड शहरातील इंदिरा नगर परिसरातील ०७, गजानन नगर परिसरातील ०१ व सिव्हील लाईन्स परिसरातील ०१, मांगवाडी येथील ०१ आणि वनोजा (ता. रिसोड) येथील ०२ व्यक्तींचा समावेश आहे. दरम्यान, भापूर (ता. रिसोड) येथील एका महिलेला उपचारानंतर आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
जिल्ह्याबाहेर ४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह; २ व्यक्तींना डिस्चार्ज
वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या व उपचारासाठी जिल्ह्याबाहेरील रुग्णालयात दाखल असलेल्या ०४ व्यक्तींचे अहवाल १३ जुलै रोजी पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये #मंगरूळपीर शहरातील दिवाणपुरा परिसरातील ०१ आणि उंबर्डा बाजार (ता. कारंजा लाड) येथील प्रत्येकी व्यक्तीचा समावेश असून हे दोघेही वर्धा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत आहेत. तसेच अकोला व नाशिक येथे उपचार घेणाऱ्या वाशिम शहरातील दोन व्यक्तींचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.