कलम १८८ नुसार १ लाख ०१ हजार ३१६ गुन्हे नोंद झाले असून १९,५१३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे
राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या २०० घटना घडल्या. त्यात ७३२ व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते ९ मे या कालावधीत कलम १८८ नुसार १ लाख ०१ हजार ३१६ गुन्हे नोंद झाले असून १९,५१३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ८२ लाख २७ हजार ७९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.