कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात आढावा बैठक संपन्न: जयंत पाटील
मला विश्वास आहे सोलापूर कोरोनावर मात करणार !
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालकमंत्री मा. दत्ता भरणे यांच्यासह जिल्ह्याची आढावा बैठक घेतली. या बैठकीत जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. दरम्यान बैठकीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित केले. महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त कोरोनाच्या टेस्ट केल्या जात आहेत. सोलापूर जिल्ह्यात सध्या १२४ रुग्ण आहेत त्यामुळे थोडी चिंता आहे. संपूर्ण राज्यात सरकार आणि प्रशासनामध्ये योग्य समन्वय आहे. या समन्वयाच्या जोरावर सोलापूरातही कोरोनावर मात करू असा मला विश्वास आहे.
IFSC बाबतचा निर्णय केंद्राने घेतला आहे. जेव्हा ही प्रक्रिया सुरू होती तेव्हा आम्ही सभागृहात आणि सभागृहाबाहेर याचा विरोध केला पण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर भाष्य केले नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. तिला एक वेगळे महत्त्व आहे. मात्र गेल्या २०१४ पासून भाजपने मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा डाव आखला आहे. महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था कमकुवत करून गुजरातची आर्थिक व्यवस्था चांगली करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. हे आता जनतेने जाणले आहे.