महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांची संख्या झाली एक लाखावर + आरोग्य मंत्री राजेश टोपे
• राज्यात कोरोना बाधित ९५७ रुग्ण बरे होऊन घरी परतले - आरोग्यमंत्री राजेश टोपे
• ५० वर्षांखालील व्यक्तींचा मृत्यूदर कमी
• राज्यात आज ३९४ नवीन रुग्णांचे निदान
आज राज्यात कोरोनाबाधित ३९४ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ६८१७ झाली आहे. आज ११७ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ९५७ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ५५५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख २ हजार १८९ नमुन्यांपैकी ९४ हजार ४८५ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ६८१७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख १९ हजार १६१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ८,८१४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.