ताजी बातमी

मुंबई : एसीबी इंटरनॅशनल प्रा. लि. अंबरनाथ, जि.ठाणे या कंपनीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड १९ या खात्यात दहा कोटी रुपयांची मदत जमा केली असून समाजाप्रतीचे आपले दायित्व दाखवून देतांना शासनाबरोबरीने या विषाणुविरोधातील युद्धात आपला सहभाग नोंदवला आहे.

शंभरटक्के निर्यात करणारी ही कंपनी प्लास्टिक मोल्डिंग मशिन आणि साचे तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याशिवाय सॅनिटायझर, कफसिरप, वॉटर ॲण्ड बेबी फिडिंग बॉटल्सची तसेच इतर बॉटल्सची निर्मितीही या कंपनीकडून केली जाते. त्यांची उत्पादने देशातील तसेच जागतिक बाजारपेठेमध्ये विकली जातात.  त्यांची पॅरेंट कंपनी असलेल्या जपानच्या निसेई एएसबी कंपनीने सात कोटी रुपयांची मदत प्रधानमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केल्याचेही कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी कळवले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एएसबी कंपनीच्या या मदतीबद्दल आभार व्यक्त केले आहेत. कोविड १९ साठी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड १९ मध्ये आतापर्यंत २६५ कोटी रुपये जमा झाले आहेत

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात