ताजी बातमी

जयसिंगपूर येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये शिरोळ तालुक्यातील मुस्लिम समाजातील धर्मगुरु व समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. सध्या सर्वत्र सुरु असलेल्या लॉक डाउनच्या परिस्थितीमुळे संचारबंदीचे नियम लागू करण्यात आलेले आहेत. तसेच कोणत्याही धार्मिक, सांप्रदायिक व सांस्कृतिक उत्सवास अथवा कार्यक्रमास निर्बंध घालण्यात आलेले आहे. यातच मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिना व ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कुठेही गर्दी होऊ नये व कुठल्याही प्रकाराने नियमांचे उल्लंघन होऊ नये, असे या बैठकीदरम्यान सूचित केले.


 यासर्व बाबींच्या संदर्भात उपस्थित सर्व मान्यवरांनी सकारात्मक प्रतिसाद देत मुस्लिम समाज व समाज बांधवांतर्फे तसेच सर्व संघटनांतर्फे नियमांचे पालन केले जाईल तसेच या कठीण काळात आम्ही प्रशासनासोबत आहोत असे आश्वासन दिले. यावेळी जयसिंगपूर शहर मुस्लिम समाज जामे मस्जिद ट्रस्ट मार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रुपये ५१,००० रुपयांचा धनादेश माझ्याकडे सुपूर्द केला. 


यावेळी जयसिंगपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय बोरीगिड्डे, शिरोळचे पोलिस निरीक्षक श्री. कुंभार, कुरुंदवाडचे पोलिस निरीक्षक श्री. चंद्रकांत निरावडे, गटविकास अधिकारी श्री. शंकर कवितके, धर्मगुरु मौलाना रहीमतुल्ला, अब्दुल मस्जिद अहमदउल्ला, जमालउल्ला, अवाबरहेमान, कुरुंदवाडचे मौलाना ईर्शाद, महमंदअली, मसुदभाई, अब्दुलरौफसाहेब, कारीउमरसाहेब, तसेच हाजी सिकंदर गैबान, बी.सी.फरास, आफताब अत्तार, दस्तगीर नंदगावे, शकील गैबान, मुनिर शेख (गौरवाड), फारुक कडवी, गुलामभाई शेख, गुलाबभाई मुजावर, इम्रानभाई मुजावर, डॉ. देसाई व मान्यवर उपस्थित होते.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात