अहमदनगर, मालेगाव आणि सोलापूर शहरात कोविड१९ चा प्रादुर्भाव वाढत असल्याने या तिन्ही ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकांची नेमणूक : वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
अहमदनगर, मालेगाव आणि सोलापूर शहरात कोविड१९ चा प्रादुर्भाव वाढत असल्याने या तिन्ही ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकांची नेमणूक. हे डॉक्टर्स संबंधित जिल्ह्यात जाऊन करोना च्या उपचारपद्धती बरोबरच तांत्रिक मार्गदर्शनही करणार- वैद्यकीय शिक्षण मंत्री
अमित देशमुख यांची माहिती.
मुंबईतील ग्रॅण्ट मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे आणि औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कम्युनिटी मेडिसीन विभागाचे असोसिएट प्रोफेसर डॉ. भारत चव्हाण यांची अहमदनगर जिल्ह्यासाठी नेमणूक- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कम्युनिटी मेडिसीन विभागाचे प्रोफेसर डॉ. श्रीराम गोसावी आणि याच महाविद्यालयातील सर्जरी विभागाचे प्रोफेसर डॉ. अजय सुभेदार हे मालेगाव येथे जाऊन कोविड१९ च्या नियंत्रणाचे काम पाहतील- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
सोलापूर येथील डॉ.वैशंपायन मेमोरियल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर आणि याच महाविद्यालयातील मेडिसीन विभागाचे प्रमुख प्रोफेसर डॉ. प्रसाद यांची सोलापूर येथील कोविड१९ नियंत्रणासाठी उपचार आणि तांत्रिक सल्ला देण्यासाठी नेमणूक- मंत्री अमित देशमुख