विद्यापीठांमध्ये टेस्टिंग लॅब सुरू करण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सूचना
- कोरोना प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षा वेळापत्रक नव्याने जाहीर होणार
- विद्यापीठ आणि महाविद्यालय परीक्षेच्या नियोजनासाठी समिती गठित
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजनेचा एक भाग म्हणून विद्यापीठ, महाविद्यालयीन आणि सीईटी परीक्षेचे नियोजित वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये परीक्षेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, या सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले.