ताजी बातमी

• किराणा दुकानांना वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणेकडून खबरदारी

• जीवनावश्यक वस्तूंचा राज्यात तुटवडा नाही

• राज्यात मुबलक प्रमाणात धान्याचा साठा उपलब्ध

• एलपीजी सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून ऑईल कंपन्यांकडूनही त्यांचा नियमित पुरवठा

• पुरवठा कामगारांचा तुटवडा असूनही गॅस सिलिंडर ग्राहकांना घरपोच करण्यासाठी प्रयत्न

• दुधाचा कोठेही तुटवडा नाही. उलट, दुधाच्या पुरवठा क्षमतेपेक्षा त्याची विक्री कमी

• मुंबईसारख्या शहरातील किरकोळ दुकानांच्या क्षेत्रातील पुरवठा साखळी सुरळीत व्हावी याकरिता मोठ्या व्यावसायिकांबरोबर राज्य शासनाची यंत्रणा सातत्याने संपर्कात

• डिटर्जंट आणि साबणाच्या पुरवठ्याबाबत राज्यात कोठेही मोठा तुटवडा नाही

• औषधे, लहान मुलांचे खाद्य, इन्सुलिन आदींच्या पुरवठ्याबाबत कोठेही मोठा तुटवडा नाही.

• राज्यातील सर्वसाधारण पुरवठा साखळी समाधानकारक कार्यरत, नागरिकांनी घाबरुन जाण्याचे व वस्तूंचा साठा करण्याचे कोणतेच कारण नाही.

• मोफत तांदळाचे वाटपच सुरू झाले नसल्याने पैसे घेऊन तांदूळ विकल्याबाबतच्या बातम्या तथ्यहीन

• किराणा दुकाने ही अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत उघडी ठेवण्याचे निर्देश

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात