ताजी बातमी

अशा परिस्थितीत काही नागरीक जाणीवपूर्वक whatsapp, twitter, Facebook व ईतर सोशल मीडीयावरुन रत्नागिरीमधील भिन्न धर्मीयांच्या भावना भडकावतील/दुखावतील अशा प्रकारच्या भडकाऊ पोस्ट/मेसेज/Video clips/Images कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता शेअर करीत आहेत, फॉरवर्ड करीत आहेत त्यामुळे रत्नागिरी शहर व परिसरातील सामाजिक सलोखा/ऐक्य धोक्यात येऊन सामाजिक तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता दिसून येते.

म्हणुनच रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे सर्व सुजाण *रत्नागिरीकरांना आवाहन* करण्यात येते की, सोशल मिडीयावरुन धार्मिक/जातीय भावना भडकाऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा कोणत्याही प्रकारच्या पोस्ट/मेसेज/video clips/Images/photo शेअर/ फॉरवर्ड करु नये. आपल्याला अशा पोस्ट पाठविणाऱ्या/ पसरविणाऱ्या व्यक्ती संदर्भात काही माहिती द्यावयाची असल्यास ती सोशल मिडीयाद्वारे शेअर किंवा फॉरवर्ड न करता खाली नमुद केलेल्या संपर्क क्रमांकावर किंवा जवळचे पोलीस अधिकारी यांना कॉल करून दयावी, आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

  *कोणत्याही व्यक्तीने अशा स्वरूपाचे मेसेज/पोस्ट/video clips/Images/photo कोणतीही खातरजमा न करता सोशल मिडीया किंवा ईतर माध्यमातून पसरविल्यास किंवा पाठविल्यास किंवा प्रसारीत केल्यास संबंधित व्यक्ती तसेच तिला सहाय्य करणारी व्यक्ती किंवा Whatsapp Group चा Admin यांचेवर भारतीय दंड संहिता कलम १५३, १५३(अ), २९५(अ), २९८, ५०५(२) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १९५१ तसेच साथरोग प्रतिबंधक अधिनियम १८९७ तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच प्रचलित कायद्याच्या तरतुदीन्वये कठोर कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी..!!!*

संपर्क क्रमांक :-*

(१)आपत्ती निवारण नियंत्रण कक्ष

  02352/222233

(२) जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष 

   02352/ 222222

(३) रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन 

   02352/222333

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात