ताजी बातमी

संपूर्ण रुग्णालय सध्या कोरोना बाधित व संशयित रुग्णांसाठी राखीव केले आहे. तसेच बाहेरून प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला, अपघातग्रस्त व इतर उपचारांसाठी येणाऱ्या रूग्णांच्या सोयीसाठी सीपीआर रुग्णालयामध्ये एक माहिती कक्ष  सुरु करावा, अशी सूचना यावेळी वरिष्ठ डॉक्टर्स व अधिकाऱ्यांना दिली.

तसेच कोरोना बाधित व संशयितांच्या विशेष काळजी घेऊन त्यांच्यावर योग्य व लक्षपूर्वक उपचार करावे, अशी सूचना केली. दरम्यान डॉक्टर्स व अधिकारी वर्गासमवेतच्या आढावा बैठकीनंतर कसबा बावडा येथील सेवा रूग्णालयाला भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली.

याप्रसंगी सेवा रुग्णालयाचे प्रमुख डॉ. श्री. उमेश कदम, आरोग्य अधिकारी श्री. केंम्पी पाटील,अधिष्ठाता सौ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्री. योगेश साळे तसेच रुग्णालयाचे डॉक्टर्स, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात