स्वस्त धान्य दुकानदार सुरेखा संजय महाले यांनी धान्य वाटप करण्यासाठी अभिनव कल्पना अंमलात आणली
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील देशमुखवाडी येथील स्वस्त धान्य दुकानदार सुरेखा संजय महाले यांनी धान्य वाटप करण्यासाठी अभिनव कल्पना अंमलात आणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचा अभिनव उपक्रम राबविला आहे.
दुकानात स्वस्त धान्य वाटप करण्यासाठी एक मोठे नरसाळे आणि स्वतंत्र पाईप ठेवले आहे. लाभार्थी दुकानात आल्यावर दुकानदार ई-पॅास मशिनद्वारे स्वत:चे आधार अधिप्रमाणित करून लाभार्थ्यासमोर धान्य मोजतात. त्यानंतर लाभार्थ्यास पाईपच्या दुस-या टोकास पिशवी लावणेस सांगितले जाते. लाभार्थीनी पाईपच्या दुसऱ्या टोकास पिशवी लावल्यानंतर त्या दुकानातून मोठ्या नरसाळ्यातून धान्य सोडतात. हे धान्य नरसाळ्यातून आपोआप लाभार्थीच्या पिशवीत पडते. यामुळे Social Distancing होत असून लाभार्थ्यांना उभे राहण्यासाठी 5 फुट अंतरावर चौकोन तयार करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी रांगेत या चौकोनातच उभे राहण्याच्या सूचनाही त्या सर्वांना देतात.